Online Recruitment System

Home Contact Us About Us  

गोदावरी लक्ष्मी को-ऑप.बँक लि., जळगाव

गोदावरी लक्ष्मी को-ऑप.बँक लि., जळगाव या बँकेत संगणकीय अधिकारी, अधिकारी , लेखनिक व शिपाई पदे भरावयाची आहेत. त्यासाठी खालीलप्रमाणे पात्रता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यांत येत आहेत. View Paper Advertisment

(१) लेखनिक पदासाठी :-

पात्रता:-मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक व एम.एस.सी.आय.टी./समतुल्य (equivalent certification course) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
प्राधान्य:-जे.ए.आय.आय.बी./सी.ए.आय.आय.बी./जी.डी.सी.ए./तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकिंग/सहकार/कायदेविषयक पदविका.
अनुभव:-बँका/पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांतील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
वयोमर्यादा:-२३ ते ३५ वर्षे.
लेखी परीक्षा शुल्क:-रु.८००/- (जी.एस.टी.सह)
अर्ज करण्याची शेवटची तारीख:-24.02.2024.


(२) अधिकारी पदासाठी :-
पात्रता:-मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक व एम.एस.सी.आय.टी./समतुल्य (equivalent certification course) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
प्राधान्य:-जे.ए.आय.आय.बी./सी.ए.आय.आय.बी./जी.डी.सी.ए./तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकिंग/ सहकार/ कायदेविषयक पदविका/ डी.सी.एम.उत्तीर्ण
अनुभव:-बँका/पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांतील कामकाजाचा किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक
वयोमर्यादा:-२५ ते ४५ वर्षे.
लेखी परीक्षा शुल्क:-रु.८००/- (जी.एस.टी.सह)
अर्ज करण्याची शेवटची तारीख:-24.02.2024.


(३) संगणकीय अधिकारी (आय.टी.ऑफीसर पदासाठी) :-
पात्रता:-कॉम्प्युटर मधील बी.सी.एस./बी.ई./बी.टेक./एम.सी.एस./एम.सी.एम./एम.सी.ए. विषयाची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक, तसेच सी.सी.एन.ए. अ‍ॅण्ड सी.ई.एच. कोर्स आवश्यक.
प्राधान्य:-डेटा सेंटर, नेट वर्कींग, बँकिंग आय.टी.विभाग संबंधित कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
वयोमर्यादा:-२३ ते ४५ वर्षे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख:-24.02.2024.


(४) शिपाई पदासाठी :-
पात्रता:-१० वी उत्तीर्ण, मराठी/हिंदी/इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक.
वयोमर्यादा:-२३ ते ३३ वर्षे.
लेखी परीक्षा शुल्क:-रु.५००/- (जी.एस.टी.सह)
अर्ज करण्याची शेवटची तारीख:-24.02.2024.

वरील पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पूर्ण माहिती (सी.व्ही.) व ई मेल ॲड्रेस सह खाली दिलेल्या लिंकवर जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत ऑनलाईन पाठवावेत. त्यानंतर आलेल्या अथवा अर्जासोबत परीक्षा फी न पाठविणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्जासोबत परीक्षा फी न पाठविणार्‍या अथवा मुदतीनंतर आलेल्या अथवा अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही. लेखी परीक्षा ऑफ लाईन पध्दतीने जळगांव येथे घेण्यांत येईल. परीक्षेचे ठिकाण व दिनांक, परीक्षेचे स्वरुप इत्यादीबाबतची माहिती पात्र उमेदवारांना ई-मेल वर स्वतंत्रपणे कळविण्यांत येईल. अर्जासोबत (ना परतावा तत्त्वावर) पाठवावयाचे विहीत परीक्षा शुल्क (जी.एस.टी.सह) असोसिएशनच्या खालील खात्यावर एन.ई.एफ.टी. ने जमा करावे व शुल्क जमा केल्याची पावती उमेदवाराचे नाव नमूद करुन अर्जासोबत pba.recruit.glbj@gmail.com या मेलवर पाठवावी. परीक्षा शुल्क नातेवाईकांच्या अथवा अन्य खात्यावरुन पाठविली असल्यास त्याचा तपशील अर्जामध्ये नमूद करणे गरजेचे आहे.

असोसिएशनच्या खात्याच्या तपशील :-
Cosmos Co-operative Bank Ltd.
Parvati darshan Br.
Saving A/c No.0010501028653
IFS Code : COSB0000001


Link for Filling Online Application form :

Online Application (For IT Officer only)

Online Application (For Other Post)